मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तसेच प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अश्यातच बोलताना माणसाचं भान सुटलं तर जीभ घसरते. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं. आणि त्यांच्या त्याच वक्तव्यावरून मात्र अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. त्यानंतर अखेर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु आता त्यांच्यावर सर्वांकडून टीकेची झोड होत आहे. अश्यातच संजय राऊतांनी जोरदार हल्लबोल हा केला आहे.
महायुतीच्या प्रचारसभेत जतमध्ये भाषण करताना त्यांनी राज्यातीलच नव्हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जतमध्ये पार पडली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन बोलत जे वक्तव्य केलं आणि त्याच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा राजकारण पेटून उठले आहे. या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
ज्या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. आपण समाजकारणात राजकारणात काय केलं मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. या सदा खोतच्या बापाने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री यांनी बारामती जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे हे वारंवार सांगितलं आहे. पवारसाहेबांचं बोट पकडून आम्ही कस राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं, असं संजय राऊत म्हणालेत. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं संजय राऊत म्हणालेत. पवार साहेबांसारखा नेता हा राज्यात नाही तर देशाच्या राजकारणातला भीष्मपिता आहे हा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचा वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेन खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य काय ?
जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल खोत यांनी विचारला. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. “ पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत माफी मागताना काय म्हणाले?
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे. मी बोललेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे, असे ते म्हणाले. “कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे खोत म्हणाले. तसेच, “मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. कारण एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते,” असेही खोत यांनी सांगितले
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर