Wednesday, April 24, 2024

Latest Posts

सोनिया गांधी ४ वर्षानंतर पाहिल्याचं उतरणार प्रचारात

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी हुबळी येथे सभा करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे देखील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. तर, राहुल गांधीही आज 3री जाहीर सभा घेणार आहेत. कर्नाटक राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी शनिवार हा अत्यंत कामाचा आणि तेवढाच महत्वाचा दिवस असणार आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी हुबळी येथे सभा करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे देखील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. तर, राहुल गांधीही आज 3री जाहीर सभा घेणार आहेत. कर्नाटक राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी शनिवार हा अत्यंत कामाचा आणि तेवढाच महत्वाचा दिवस असणार आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींसह भाजपच्या बड्या दिग्गजांचे रोड शो आणि जाहीर सभा होणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही आज स्वतः निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोनिया गांधी यांनी हुबळी येथे निवडणूक रॅलीला संबोधित कर असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही सोनिया गांधींसोबत हुबळीच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधीही आज जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. राहुल गांधींचा ७ मे रोजी बंगळुरूमध्ये भव्य रोड शो होणार आहे.

गेल्या चार वर्षा नंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच प्रचार करणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधींचा प्रचा या खूप वेगळाच असल्याचे स्पष्ट केलं जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या बाजूने जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये आले आहेत. तर, भाजपकडून हुबळी-धारवाड मतदारसंघातून महेश टेंगीनकाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सोनिया गांधी यांची कर्नाटकातील ही एकमेव जाहीर सभा आहे. हि सभा घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघातून संध्याकाळी ६ वाजता हुबळी येथे जगदीश शेट्टर यांच्या बाजूने निवडणूक रॅलीला त्या संबोधित करणार आहे आणि त्यानंतर तिथून त्या पार्ट येणार असल्याचे सांगितले आहे. सोनिया गांधींच्या जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गेही सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा कर्नाटकात प्रचारादरम्यान राहुल गांधींचे सलग 3 कार्यक्रम होणार आहेत. बेळगावच्या यमकनमर्डी येथे दुपारी २. ५० वाजता राहुल गांधी एका सभेला संबोधित करतील. यानंतर ते बेळगावमधील चिक्कोडी येथे दुपारी ४. १० वाजता आणि हुबळी येथे ६ वाजता जाहीर सभांना संबोधित करतील. हुबळीच्या जाहीर सभेत सोनिया गांधींसोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या रॅली आणि रोड शो कर्नाटकातील निवडणूक प्रचारात काँग्रेसने कोणतीही कसर सोडलेली नाही. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. पक्षाच्या या दिग्गजांनी आतापर्यंत ४३ रॅली, १३ रोड शो, महिला आणि तरुणांशी ६ संवाद आणि कार्यकर्त्यांसोबत ५ बैठका घेतल्या आहेत. रविवारी ७ मे ,राहुल आणि प्रियंका गांधी बंगळुरूच्या शिवाजी नगरमध्ये संयुक्त रॅली काढणार आहेत. तसेच १० मे रोजी कर्नाटकातील २२४ सदस्यीय विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एकूण ५,२१,७३,५७९ मतदार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

हे ही वाचा : 

राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो, छगन भुजबळ

महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र – आदित्य ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss