स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असतानाच आता महायुतीमध्ये देखील अंतर्गत कुरबुरींना प्रारंभ झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. कमालीचे बहुमत महायुतीकडे असल्याने राज्यात विरोधी पक्षनेते पद सुद्दा विरोधी पक्षाला मिळविता आले नाही. इतका दणदणीत विजय मिळवूनही एकहाती सत्ता असून कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू झालेली दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्टवादी कॉग्रेसच्या मंत्र्याचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी रोखल्यामुळे कुरबुरी वाढली.
लोकसभेनंतर विधानसभेत महाविकास आघाडीने ताकदीनिशी निवडणूक लढविल्या. मात्र, लोकसभेप्रमाणे विधानसभेत महाविकास आघाडीला यश ना आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी सुरु झाल्याने काँग्रेसमधून देखील स्वबळाची सूर निघायला सुरुवात झाली आहे एकीकडे महाविकास आघाडीत मतभेद सुरु असतानाच महायुतीमध्ये देखील काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली आहे पण आता महायुतीतील पक्षांमध्ये कटुता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या फायलीं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून रोखण्यात आल्याने अजित पवार संतापले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर आमदारांसोबत झालेल्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर बैठकीची माहिती देताना त्यांनी देवगिरी येथील माझ्या निवासस्थानी पक्षाच्या आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
पक्षाच्या या बैठकीत राज्यातील समस्या आणि पक्षाचे भविष्य यावरही सविस्तर चर्चा झाली. अजित गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण विभाग) आणि बाबासाहेब पाटील मंत्री (सहकार विभाग) यांनी त्यांच्या विभागांबाबत काही निर्णय घेतले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर निर्णय थांबवले आहेत. याबद्दल अजित गट संतप्त आहे. अजित पवार म्हणतात की जर महायुतीमध्ये सहभागी पक्षांना या आघाडीसोबत पुढे जायचे असेल तर त्यात सहभागी असलेल्या सर्व पक्षांना एकमेकांशी समन्वयाने काम करावे लागेल. त्यांच्या मते, कोणताही निर्णय रद्द करण्यापूर्वी त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे अन्यथा गोंधळ निर्माण होईल. असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
– किशोर आपटे
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती