बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. याप्रकरणावरुन अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आपले मते व्यक्त केली आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. यातच आता, एकीकडे वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याच्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाल्मिक कराड चा मुलगा सुशील कराड याच्या विरुद्ध अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुशील कराड कडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची लूट व मारहाण केल्या प्रसंगी कारवाई करण्यात आली आहे. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्तीने ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सुशील कराडने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप केला जात आहे.
पीडित महिलेचा पती, सुशील कराड कडे मॅनेजर म्हणून काम पाहत होता. यावेळी सुशील कराड मॅनेजरला वारंवार विचारायचा तू एकढे पैसे कसे कमावले? २ गाड्या, २ ट्रक कुठून आले. सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तिघांनी मिळून त्याचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. त्याच्या दोन ब्लकर ट्रक आणि दोन गाड्या यांच्या चाव्या तसेच त्याची कागदपत्र त्याच्याकडे ठेवली. इतकंच नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले. पीडित महिलेने सोलापूर पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. पण तरीही कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही. मग शेवटी त्या पीडित महिलने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. त्यामुळे वाल्मिक कराड चा मुलगा सुशील कराड अडचणीत सापडला आहे.
हे ही वाचा:
MNS बद्दल विचारताच आदित्य ठाकरेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा !, म्हणाले,…