spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

वाल्मिक कराड पुण्यातून शरण आल्यांनतर…. CID अधिकारी आव्हाडांनी दिली पुढील माहिती…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सतत वाल्मिक कराडचा नाव समोर येत होत. आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने आज सीआयडी पोलिसांच्या शरणात आलाय. पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीड सीआयडीचे डीवायसी आहेत, जे या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे. या अटकेनंतर प्रथमच सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

 

आज साडेबाराच्या दरम्यान वाल्मिक कराड हा केज पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या शरणात आलाय. आरोपी वाल्मिक कराड हा आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालयात हजर झालेला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलं असून त्याची थोडीफार चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आले आहे. आरोपी वाल्मिक कराडला आमच्या टीमसह बीडचे तपासी अंमलदार जे आहेत, बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे रवाना करण्यात आलं असल्याचं सारंग आव्हाड यांनी सांगितलं. तसेच, पुढची तपासणी गुजर हेच करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तसेच, मंत्री धनजंय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. कारण, वाल्मिक कराडने शरण येण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती आणि स्वत:च्या खासगी कारने तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता, सीआयडी पोलिसानी प्रथमच याबाबत माहिती दिली.

विरोधक धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची राजीनाम्याची मागणी करत आहे असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधाकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss