जगभरात मोबाईल प्रत्येक व्यक्ती वापरतो. मोबाईलच्या अॅप द्वारे आपण फोन कॉल करतो, महत्वाचे मॅसेज देखील आपण पाठवतो, फोटो काढतो, विडिओ काढतो, एंटरटेनमेंट साठी सोशिअल मीडियावर व्हिडिओबघतो. मात्र हाच आपला मोबाईल हॅक झाला तर? आजकाल जगभरात मोबाईल हॅक होण्याच्या घटना रोज समोर येत आहे. झिरो क्लीक टेकनिकचा वापर करण्यात येत असल्याचे मेटाने म्हंटले आहे. यालाच बळी आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पडले आहे. यांचे व्हाट्सअॅप मंगळवारी हॅक झाले. त्यांना ही गोष्ट कळताच त्यांनी तुरंत ‘एक्स’ या सोशल माध्यमावर पोस्ट करून त्यासंदर्भात माहिती दिली आहे. काय घडलं नेमकं? कसे होतात झिरो क्लीकचे शिकार ? हॅक होतंय कसे कळणार ? बघुयात..
मंत्रालयात कॅबिनेट बैठकीसाठी कोकाटे उपस्थित होते. त्याच सुमारास व्हाट्सअप हॅक झाल्याचा त्यांना समजलं. त्यांनी तुरंत ‘एक्स’ या सोशल माध्यमावर या संधर्भात माहिती दिली. व्हॉटस अॅप हॅक करण्यात आले असून माझ्या व्हॉटस अॅप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा ‘एपीके’ अॅप क्लिक किंवा ओपन करू नये. कृपया सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे कोकाटे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
या हल्ल्यासाठी पॅरेगॉन सर्विलांस सॉफ्टवेअरचा वापर केला असून ग्राफाईट असे त्याचे नाव आहे. या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या चॅटवर, लिंकवर तसेच डॉक्युमेंट्सवर क्लिक करू नये, असे आवाहन केले जात आहे. याद्वारे युजरच्या खात्याची सर्व गोपनीय माहिती हॅकर्स पळवू शकतात. चुकून रिकव्हरी कोडचा वापर केला, तर सेटिंगमधून पासवर्ड तत्काळ बदलण्याचे आवाहन गुगलने केले आहे.
आता झिरो क्लीकचे टेक्निक काय आहे
तर परेगॉन सर्विलांसचे ग्राफाईट सॉफ्टवेअर झीरो क्लिक टेक्निकवर काम करते. त्याचा अर्थ विना क्लिक करता ते तुमच्या डिवाईसमध्ये पोहोचते आणि डेटा चोरी करते. मोबाइल धारकांना या घुसखोरीची कल्पनाही नसते. अशीच एक फाइल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाइलमध्ये आली आणि त्यांचे अकाऊंट हॅक झाले.
व्हॉटस अॅपने पेरेगॉन कंपनीला नोटीस पाठवली असून त्याचबरोबर कंपनी कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. अशा स्पायवेअर किंवाव्हायरसपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी व्हॉटस अॅप आता आपल्या अॅपची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे.
मोबाइल हॅक होतेय हे कसे कळणार?
व्हॉटस अॅप अकाऊंटमध्ये अनोळखी कॉन्टॅक्ट दिसले तर हे तुमचे व्हॉटस अॅप अकाऊंट हॅक होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या व्हॉटस अॅप अकाऊंटवरून अनोळखी कॉन्टॅक्टसोबत चॅटिंग केले असेल तर अकाऊंट हॅक झालेले असेल. व्हॉटस अॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करता आले नाही तरी तुमचे अकाऊंट हॅक झालेले असू शकते. तुमच्या मोबाइल नंबरमध्ये सतत व्हेरिफिकेशन कोड सापडत असतील तर तुमचे व्हॉटस अॅप अकाऊंट धोक्यात आलेले असू शकते, हे लक्षात ठेवा.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा