शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब एकत्र व्हावं अशी प्रार्थनाच आज पंढरीच्या पांडुरंगाकडे केली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी यांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रतिक्रिया
रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोन नेते पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अडथळा ठरतायेत. या दोघांनाही पवार कुटुंब एकत्र यावं, असं वाटत नसल्याचं मिटकरी यांनी म्हटलं. आशाताईंनी व्यक्त केलेल्या भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. शेवटी पवार कुटुंबातील वरिष्ठ लोक यावर एकत्र येण्यावर निर्णय घेतील असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरींचा काय आहे संकल्प
दरम्यान, 2024 हा काळ राष्ट्रवादीसाठी अतिशय संघर्षाचा काळ होता. पण अजितदादांनी आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. आता 2025 हे वर्ष राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचं असणार आहे. 2025 डिसेंबरपर्यत अजितदादांचं नेतृत्व महाराष्ट्रात आणखी ठळकपणे समोर येणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. दरम्यान, आपण भूतकाळातील आपल्या चुका सावरत नवीन वर्षात काम करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय. मात्र, अमोल मिटकरी यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांचे, दोन आमदारांचे नाव घेऊन पवार कुटुंब एकत्र येण्यास हे दोनच नेते कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये, रोहित पवार हे पवार कुटुंबातीलच आहेत. तर, जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना पितृतुल्य मानतात. त्यामुळे, मिटकरी यांच्या दाव्यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका