spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत, उत्तम जानकर यांचा दावा

महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडली. मोठ्या बहुमताने महायुती सरकारला विजय मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नवीन मंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली तर अनेक जुने मंत्र्यांना डावलण्यात आले. निकाल लागताच विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोलापूरच्या माळशिरस गावात ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपर पुन्हा मतदान घेण्यात येणार होत. मात्र पोलिसांनी जमावबंदी करत हे मतदान थांबवले. आता माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जाणकार यांनी दावा केलं आहे. गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचा मतदारसंघ आहे, अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा यावेळी उत्तम जानकर यांनी केला आहे, त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर
या सरकारने आत्ता जी विधानसभा निवडणूक घेतलेली आहे, त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदार संघामध्ये यांनी गडबड केली आहे. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत, पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी एक लाख 80 हजार मिळाली आहेत. त्यापैकी एक तृतीयांश प्रपोर्शन इथे देखील लावलेलं होतं, त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख 40 हजार आहेत. त्यातील 60 हजार मते वजा होतात, त्यानंतर 1 लाख 20 मतांवरती अजित पवार राहतात. अजित पवार यांचे फक्त 12 आमदार या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 आमदार निवडून आलेले आहेत असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केले आहे.

त्याचबरोबर आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी आम्ही जाणार असल्याची माहिती बारामतीत माध्यमांशी बोलताना दिली आहे. दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहे, असंही ते म्हणालेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 12, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले असल्याचा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

पुढे ते बोलले, बारामतीसह जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास 5 अशी सेटिंग करण्यात आली होती. त्यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. त्यांची जवळपास 30 हजार मते विरोधी उमेदवारांची आहे. ते 13 हजार मतांनी पडले आहे. मी या सर्व प्रकरणाचा सखोल अभ्यास करत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला तयार नसाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली पाहिजे, पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे असं खुलं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

संतोष देशमुख प्रकरणावर केलं भाष्य
या प्रकरणात दोषी आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मीक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता, वाल्मीक कराड यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता, त्याच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता, तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे. इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणालातरी नेवून द्यायचं, या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्याला माझाही पाठिंबा आहे. त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्यासोबत असेल. वाल्मीक कराड याला अटक करावी, त्याला तात्काळ अटक झाली नाही, तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही उत्तमराव जानकर म्हणालेत.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss