राज्यात विधानसभेनंतर राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अश्या बाबी पूर्णपणे टाळा अश्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. देवगिरी येथे अजित पवारांची बैठक पार पडली. त्यात ही सूचना देण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी 25 फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, 284 नगरपंचायत यांच्या निवडणुकालांबणीवर पडल्याने पक्षांना मोर्चेबांधणीसाठी वेळ मिळणार आहे.
पक्षाला अडचण होईल असं काही करू नका: अजित पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी पूर्णपणे टाळण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने जास्तीत जास्त वेळ मतदार संघात द्या. पक्षाला जादा मिळवायचे असतील तर मतदार संघातील योग्य उमेदवार कोण याचा आढावा घेऊन आपल्या पक्षासोबत त्यांना कसं जोडता येईल यावर काम करा असेही अजित पवारांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं .
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, असे सांगतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा अशा सूचना दिल्या होत्या.
हे ही वाचा :