spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर… Rohit Pawar यांना भेटत काय म्हणाले Ajit Pawar?

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक बलाढ्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अश्यातच निवडणुकीच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट झाली. यावेळी अजितदादांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पाया पडल्याचे दिसून आले.

माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त आज (सोमवार, २५ नोव्हेंबर) कराडमधील प्रीतिसंगम या समाधीस्थळी अबिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, श्रीनिवास पाटील, रोहित पवार अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळावर दाखल झाले असता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हेदेखील तेथे पोहोचले. यादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पाया पडल्याचे दिसून आले.

नेमकं काय घडलं?

अजित पवार आणि रोहित पवार समोर येताच दोघांची भेट झाली. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर, अजित पवारांनी “ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?'” असा मिश्किल टोला लगावला. यावेळी रोहित पवारांसह उपस्थित लोक हसू लागले.

काय म्हणाले रोहित पवार?

यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत रोहित पवार म्हणाले, “अजित पवार माझे काका आहेत. म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. अजित पवारांची सभा झाली असती तर वर खाली झालं असतं. उलटही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. त्यांना माझया मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदारदेखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे. मी त्यांचे अभिनंदन देखील केलं,” असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss