Maharashtra Vidhan sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ आज अखेर मतदानाला सुरुवात झाली असून, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात असून, बारामती विधानसभा मतदारसंघाचे (Baramati vidhansabha election) शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी असा आरोप केला आहे की, आमच्या कार्यकर्त्याना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दमदाटी करून बोगस मतदान करण्यात येत आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपानंतर अजित पवार यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. अजित पवारांनी सर्व माहिती घेऊन सर्व आरोप फेटाळून टाकले.
अजित पवारांनी शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपावर स्पष्ट उत्तर देत म्हंटल आहे की शर्मिला पवार यांनी केलेला आरोप धांदात खोटा आहे. आमच्या कार्यकर्त्यानी कोणालाच धमक्या दिल्या नाही. इतके वर्ष निवडणूक होत आहे, तेव्हापासून असे आरोप कधीही झाले नाही. आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. आमचे कार्यकर्ते असे करणार नाही. शर्मिला पवारांनी तक्रार केली असेल तर, या प्रकरणाबाबत पोलीस चौकशी करतील. कुठेही बोगस मतदान झालेले नाही. ५० कार्यकर्त्यांना मी देखील सांगेल द्या, तक्रारी, पण या गोष्टीला काही अर्थ आहे. यामागे काही तथ्य असायला हवं, असे अजित पवार यांनी म्हंटल आहे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्या उमेदवाऱ्याला मतदान करा. मात्र सर्वानी येऊन मतदान करावं, असे अजित पवार यांनी आवाहन केलं आहे.
अजित पवारांनी तीन बोट दाखवली
अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून बोट दाखवून इशारा करत असल्याचा असा आरोप करण्यात आला. असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी मिडल फिंगरसह करंगळी दाखवत उत्तर दिले की, अरे वेड्यांनो… तुम्हीच बोलता मतदान केल्याचं बोट दाखवा…मग मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवणार ना…दुसऱ्या बोटावर शाई लावली तर ते बोट दाखवलं. शर्मिला पवारांच्या या केलेल्या आरोपामागे नेमकं काय कारण?, असा प्रश्न देखील अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत म्हणाले तुझेही केस गेलेत, माझेही गेलेत, तरी अजून यामागचे कारण समजले नाही.
नेमकं काय घडलं बारामतीमध्ये
युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार या मतदान केंद्रात गेल्याअसता. बाहेर येऊन त्यांनी अजित पवार गटाच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणादरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यभर चर्चा होत आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. या चुलत्या पुतण्याच्या लढाईमध्ये कोण मारणार बाजी याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या प्रकरणादरम्यान अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, दमदाटी केली जात आहे. असा आरोप शर्मिला पवार यांनी यांनी केला आहे. या घडलेल्या प्रकरणा नंतर अजित पवार हे त्याठिकाणी दाखल झाले आणि सर्व माहिती घेऊन शर्मिला पावर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान