spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, राज्यातील बऱ्याच भागात पाण्याची गंभीर परिस्थिती…

राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात पाण्याची गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करत असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच आगामी परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक उपयोजना करण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असेही अजित पवार म्हणाले. परभणीतील (parbhani) शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, “सध्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परभणीसह संपूर्ण मराठवाड्याला कमी पावसाचा झळा बसत आहेत. मात्र आम्ही दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी बैठक घेतली. पुढे गणेशाचे आगमन होणार आहे, गोपाळकाला आहे, नवरात्र आहे. पुढे आणखी पाऊस पडायचा आहे. अद्याप परभणीत ४३ टक्के पाऊस पडला आहे. दोन पावसात अंतर मोठं पडलं आहे. मराठवाड्यात केवळ नांदेड (Nanded) आणि हिंगोलीतच (Hingoli) थोडी बरी परिस्थिती आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” दरम्यान पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोक समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्पसंख्याकांच्या विरोधात हे सरकार असल्याचे सांगतात. पण आम्ही मुस्लीम समाजाच्या भेटी घेऊन त्यांच्या बैठका घेत आहोत. काहीजण महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात, असे अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्राला महापुरुष संत महात्म्यांची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्याच विचारांच्या मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे जात आहेत. शासन आपल्या दारातून करोडो लोकांना आपण न्याय दिला आहे. या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात चकरा मारायची गरज नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकप्रिय होत चालला आहे. माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच आम्ही शासन आपल्या दारी सारखी योजना राबवत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आम्हाला सर्वांनी साथ द्यावी,” असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा: 

महाराष्ट्रातील जेजुरी खंडोबा मंदिर भाविकांसाठी दीड महिने बंद…

खडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss