Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यावेळी म्हणाले, “आपण सगळेच संविधानाला मानतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते आपण ऐकलं. प्रत्येक वेळेस निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तो ईव्हीएम च्या माती मारला जातो. मात्र यश आलं तर ईव्हीएम चांगलं असं म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा खराब परफॉर्मन्स होता परंतु आम्ही त्याचा ईव्हीएमचा दोष दिला नाही. ईव्हीएम आज नाही वर्षांनुवर्ष सुरू आहे. काय आहे स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हा त्यासाठी केलेला प्रयत्न आहे. पश्चिम बंगालमध्ये, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगाना तेव्हा ईव्हीएम सुंदर आणि फर्स्ट क्लास वाटलं. निकाल विरोधात गेला तर विरोधात बोलतात.”
“२०१४ ला मोदींची लाट आली तेव्हा पण ईव्हीएमला विरोध केला. २०१९ मध्ये देखील तसंच झालं. मात्र २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांच्या जागा आल्या तेव्हा विरोधात वक्तव्य केले नाही. हे काही एका दिवसात घडत नसतं. ईव्हीएम मशीन बद्दल कोणत्याही देशाचे दाखले द्यायचे, मात्र अमेरिकेत ट्रम्प गेल्या वेळेस पडले होते.मात्र जनतेच्या मनात असत ते होत असतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे ईव्हीएम विरोधात येणार आहे किती आंदोलन केलं तरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम असतो . या लोकांचे दारून पराभव झाले आहेत हे पराभव कसे सांगायचे म्हणून कोणाच्यातरी माती मारत आहे. तो त्यांचा अधिकार आहे काय करायचं आहे,” असे ते म्हणाले.
नवीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असं सरकार होणार स्थापन
“२३ तारखेला निकाल लागला महाराष्ट्र ने एकतर्फी निकाल दिला. महाराष्ट्रने आजपर्यंत कधीच असा निकाल दिला नव्हता. काँग्रेसचा विक्रम मोडला गेला त्याबद्दल सर्वांचे आभार. आता आमच्यावर जवाबदारी वाढली आहे. उद्या मी, फडणवीस, शिंदे दिल्लीला जाणार आहोत, दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल. नागपूरला अधिवेशन आहे पुरवण्या मागण्या मान्य कराव्या लागतील. कामाच प्रेशर राहणार आहे. आमचा अनुभव असल्यामुळे अडचणी येथील असं मला वाटत नाही. सर्व समाजाला सोबत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या दिल्लीला गेल्यानंतर लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी प्रमुखांना पण भेटणार आहेत. खेळीमेळीच वातावरणात महायुतीच्या सरकार स्थापन होईल. उद्या आमची दिलेला मिटींग आहे त्या मीटिंगमध्ये जे ठरेल त्याला सगळ्यांची मान्यता असेल. एकनाथ शिंदे यांनी काय करावं त्यांच्या वाट्याला किती जागा येतील किती पदे येतील त्याबाबत सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या बाजूचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या बाबतीतचा निर्णय मी कसा सांगणार?” असे त यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule