spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स; नेमकं प्रकरण काय?

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी झाले. आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांना कोर्टात राहण्याचे समन्स आले आहे. १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजार राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले. आता या कोर्टात हजर राहण्याचे समन्स आल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहे.

नेमकं प्रकरण काय?                                                                                                                                                                                                                                                        २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा हा प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

२०१४ च्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार, सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन आणि प्रचार करत होते. परंतु दहा वर्षानंतर कोर्टात सुनावणीस आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे विरोधात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss