spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

अजित पवारांनी घेतली वेगळ्यापद्धतीने शपथ…

आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते. उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार सोहळ्यासाठी आले होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथ घेतली. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी वेगळ्यापद्धतीने शपथ घेतली आहे.

अजित पवारांनी वेगळ्यापद्धतीने घेतली शपथ 
अजित पवार यांनी शपथविधीला सुरुवात करताना म्हटले, ‘मीअजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शपथविधी समारंभाला त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार दरम्यान वापरलेला गुलाबी जॅकट परिधान केला होता.

आज शपथविधीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली. मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली आहे. अजूनही मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळेल हे स्पष्ट झालेल नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ११ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss