Monday, June 5, 2023

Latest Posts

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

राज्यामध्ये राजकारणात अनेक नेते आरोप प्रत्यारोप करत असतात. त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

राज्यामध्ये राजकारणात अनेक नेते आरोप प्रत्यारोप करत असतात. त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. अजित पवार कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले की, ज्याच्या वडिलांनी पक्ष निर्माण केला जो पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यत पोहोचला त्यांचाच पक्ष ह्यांनी काढून घेतला. त्याच चिन्ह काढून घेतले. राज्यकर्त्यांना जनतेसमोर जायला कोणताच मुद्दा राहिलेला नाही. म्हणून भावानिक मुद्दे समोर आणले जातं आहेत. सत्तेची नशा, मस्ती त्यांच्या डोक्यात चढली आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेतला.जरी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असले तरी ए जनतेला पटले आहे का? याचाही विचार व्हायला हवा. असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, जर तुमच्यामध्ये धमक होती तर काढायचा होता दुसरा पक्ष कोणी अडवलं होत तुम्हाला? असा प्रश्न अजित पवारांनी केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की यावेळी पक्षामध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. पक्ष संघटनेच्या निवडणूका सुरु आहेत त्यामुळे उद्याच्या काळात पक्षामध्ये भाकरी फिरवावी लागणार आहे. त्यानंतर परवा आमची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये २५ नेते होते आणि पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे. आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत असे ते म्हणाले आणि नवीन लोकांना संधी देणार आहे असे असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, सरकार बद्दल लोकांच्या मनात चीड आहे म्हणूनच सत्ताधारी निवडणूका कारण सांगून पुढे ढकलल्या जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्य ढवळून काढायचे आहे असे अजित पवार म्हणाले. मा मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही. देशाच्या पंतप्रधान मुर्मू आहेत असे ते सांगतात कस सरकार चाललंय? शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत अजुनपर्यत मिळली नाही कसल्या याद्या करत आहेत सरकार काय करतंय? हे सर्व सामान्यांचे सरकार आहे का? असा असा खोचक टोला अजित पवारांनी सरकारला लगावला.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss