spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार यांची तुफान फटकेबाजी, मी अजून दारूला….

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घरमोडी या होत आहेत. अश्यातच राज्याचे उपमुख्यमनातरी यांची भाषण आणि त्या भाषणमधून होणार तुफान फटकेबाजी देखील जोरदार सुरु आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घरमोडी या होत आहेत. अश्यातच राज्याचे उपमुख्यमनातरी यांची भाषण आणि त्या भाषणमधून होणार तुफान फटकेबाजी देखील जोरदार सुरु आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या वतीनं ६३ व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे द्राक्ष परिषद अंतर्गत ६३ व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. तर या परिषदेचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने झाला. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी हि केली आहे.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही!, असं अजित पवार म्हणाले अन् एकच हशा पिकला. तसेच या कार्यक्रमाला शरद पवार यांनी देखील उपस्थिती ही लावली होती. यासंदर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की, आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत! आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार, असं म्हणत अजित पवार यांनी टोलेबाजी केली. अजित पवार यांनी काल पिंपरीत केलेल्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

तसेच अजित पवार देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळं काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकतंय. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्षपासून निर्माण केली जाणारी वाईन यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात. काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात. कुणाला पहिल्या धारेची किक बसते तर कुणाला अख्खा खंबा लागतो. पण मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच मी अर्थमंत्री अन उपमुख्यमंत्री असल्यानं तुम्ही मला आज मोठेपण दिलं. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावलं, का बोलावलं? कारण अजित पवारकडे अर्थ खातं आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपलं काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिलं. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केलं असतं, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

हे ही वाचा:

अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

सरकारच्या कांदा खरेदीवर निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेची जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss