९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरु आहे. असे घडलो आम्ही’ हा कार्यक्रम मराठी साहित्य संमेलनामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत झाली. मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. अश्यातच शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट नीलम गोऱ्हे यांना टॅग करत शेअर केली आहे.
अखिल चित्रेंचा सवाल
आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 9 पदांसाठी 18 मर्सिडीज दिल्या. म्हणजे नीलम गोऱ्हे या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे हि पदं त्यांनी स्व-कर्तृत्वावर मिळवली नव्हती ! कृपया महाराष्ट्राने दखल घ्यावी, अशा शब्दांमध्ये नीलम गोऱ्हे यांच्यावरती हल्लाबोल करत सवाल उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर नीलम ताई तुम्ही म्हणता 1 पदासाठी शिवसेनेत 2 मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील 9 पदांसाठी तुम्ही दिलेल्या 18 मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. 22 फेब्रुवारी 1998 रोजी म्हणजे बरोबर 27 वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे’ !, असंही पुढे अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.
सोशल मिडिया पोस्ट काय?
आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 9 पदांसाठी 18 मर्सिडीज दिल्या… म्हणजे @neelamgorhe ह्या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे हि पदं त्यांनी स्व-कर्तृत्वावर मिळवली नव्हती ! कृपया महाराष्ट्राने दखल घ्यावी.कारण
2002 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड (पहिला कार्यकाल)
2008 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (दुसरा कार्यकाल)
2010 : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते
2011 पासून: शिवसेना उपनेते
2014 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (तिसरा कार्यकाल)
2015 : विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ
2019 : महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापती म्हणून निवड
2020 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (चौथा कार्यकाल)
2020 : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून पुनर्निवड ते आजतागायत
नीलम ताई तुम्ही म्हणता 1 पदासाठी शिवसेनेत 2 मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील 9 पदांसाठी तुम्ही दिलेल्या 18 मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. 22 फेब्रुवारी 1998 रोजी म्हणजे बरोबर 27 वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे”, असंही आखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.
Follow Us