Monday, December 4, 2023

Latest Posts

Akola Gram Panchayat Result – भाजप, काँग्रेस आघाडीवर, इतरांच काय?

आगामी विधानसभा निवडणुकीआधी सत्‍वपरीक्षा मानल्‍या गेलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीत अकोला जिल्‍ह्यात संमिश्र कौल दिसून आला आहे. काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाड्यांसाठी गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीआधी सत्‍वपरीक्षा मानल्‍या गेलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीत अकोला जिल्‍ह्यात संमिश्र कौल दिसून आला आहे. काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाड्यांसाठी गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तर वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही.

अकोला जिल्ह्यातील १४ पैकी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर भाजप, काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकवला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत तर पातूर तालूक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे. भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या गावात वंचितने बाजी मारली आहे. रणजीत पाटलांचे काका अनिल पाटील वंचितच्या पाठिंब्याने सरपंचपदी निवडून आले आहेत. घुंगशीत पाटील घराण्यात फूट पडली आहे. रणजीत पाटलांचे चुलतभाऊ असलेले राहुल पाटील सरपंच पदाच्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी आहेत.

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायत : १४
बिनविरोध : 0१
अकोला तालुका : एकूण ग्रामपंचायत : 0४ (Akola Talula GramPanchayat Election)
1) कापशी : वेणूताई उमाळे : भाजप
2) काटीपाटी : संगिता कासमपुरे : स्थानिक आघाडी
3) एकलारा : राजेश बेले : भाजप
4) मारोडी : पुजा वाघमारे : स्थानिक आघाडी

बार्शीटाकळी तालुका : एकूण ग्रामपंचायत : 0४ (Barshi Takali GramPanchayat Election)
1) खोपडी : काँग्रेस
2) दोनद खुर्द : सागर कावरे, राष्ट्रवादी शरद पवार गट
3) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
4) जांभरून : काँग्रेस

मूर्तिजापूर तालुका : 02 (Murtijapur Gram Panchayat Result)
1) घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित
2) गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले : वंचित

पातूर तालुका : एकूण ग्रामपंचायत : 0१ (Patur Taluka Gram Panchayat Result)
1) कोसगाव : रत्नमाला करवते : राष्ट्रवादी अजित पवार गट

तेल्हारा तालुका : एकूण ग्रामपंचायत : 0३ (Telhara Taluka Gram Panchayat Result)
1) बारूखेडा : अविरोध : स्थानिक आघाडी
2) पिंपरखेड : भाजप
3) झरीबाजार : काँग्रेस

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अंतिम निकाल
भाजप : 0३
वंचित : 0२
काँग्रेस : 0३
स्थानिक आघाड्या : 0३
राष्ट्रवादी शरद : 0२
राष्ट्रवादी अजित : 0१

 

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा
घुंगशी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे गाव आहे. सरपंचपदी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे काका अनिल पाटील पवित्रकार ५४ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव केला. डॉ. रणजीत पाटील यांचे चुलतभाऊ राहूल पाटील सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. घुंगशी ग्रामपंचायतीत पाटील घराण्यात दोन पॅनल पडत फूट पडली होती. डॉ. रणजीत पाटलांचा आशीर्वाद चुलतभाऊ राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे. डॉ. रणजीत पाटलांच्या काकांनी पुतण्याला धोबीपछाड केला आहे. सदस्यांपैकी सर्वच्या सर्व जागा जिंकत अनिल पाटील यांची गावावर सत्ता आली आहे. काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायत हिसकावून घेतली आहे.

Latest Posts

Don't Miss