spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोप खोटे, बदनामी करण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे

गेल्या दीड महिन्यापासून राज्यात सुरु असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सतत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि नागरिक करत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडेंशी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय. या प्रकरणाचा मूळ सूत्रधारच मंत्री धनंजय मुंडे आहेत असा आरोप करत मंत्रिपदाचा राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.

दरम्यान बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणावर गप्प असणारे मंत्री धनंजय मुंडे अखेर या प्रकरणावर बोलले आहेत. वाल्मीक करडांशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप तसेच या प्रकरणातील सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी आरोप धुडकावून लावलेत. हा केवळ बदनामीचा प्रयत्न असल्याचाही ते म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

‘जे आरोप करण्यात आले आहेत, त्यातील एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर आता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. माझी एवढीच विनंती सर्वांना मला बदनाम करायचं करा, आणखीन कोणाला बदनाम करायचे करा. माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैजनाथनगरीला बदनाम करू नका हीच माझी विनंती आहे. वाल्मीक कराडांची असणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपांवर हे सगळं खोटंय. सर्व आरोप खोटे आहेत.’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आरोप धुडकवलेत. पालकमंत्रीपदासाठी अजित पवारांना जबाबदारी देण्यासाठी मीच पक्षाला आणि अजितदादांना सांगितलं असल्याचंही ते म्हणालेत. पुण्याचा विकास केला तसा बीडचाही विकास दादा करतील असंही मुंडे म्हणालेत.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss