spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Eknath Khadse यांच्यासोबत माझी देखील नार्को टेस्ट करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ७ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अश्यातच सर्व नेतेमंडळींनी प्रचाराचा त्याच सोबत सभांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅली निमित्त बोदवड तालुक्यातील राजुरा येथे फोर व्हीलरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणातील आरोपी हा विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये दोन दिवसापूर्वी सामील झाला होता. त्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर दाखवला. पोलिसांनी संशयीत असलेला आरोपी गोळीबार होण्यापूर्वी दोन दिवसाअगोदर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी होता आणि दुसऱ्याच दिवशी अपक्ष उमेदवारावर गोळीबार होतो मी गोळीबार करणारा संशयित आमदारांच्या रॅलीत सहभागी होता तरी याचा अर्थ काय? तुमचा या गुन्हेगाराशी संबंध काय? मी गुन्हेगार आहात की नाही हे सगळ्या जगाला माहित आहे असा हल्लाबोल आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर मध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मुक्ताईनगर मध्ये गुंडगिरी वाढली आहे यावरच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्यूत्तर दिले आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की; ‘मुक्ताईनगरातील गोळीबार प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी एकनाथ खडसे यांच्यासोबत माझी देखील नार्को टेस्ट करावी” असे आव्हान देत ”या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी एसआयटी स्थापन करावी !” अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss