विशेष अधिवेशन बोलवा, केंद्राला प्रस्ताव पाठवा, राज ठाकरें एकिकडे राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे मराठा आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना उद्धेशून पत्र लिहिलं आहे. तसेच, या पत्रातून राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
v
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं पत्र ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, “मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं ‘विशेष अधिवेशन’ भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.” असं त्यांनी ट्विट कल आहे.
राज ठाकरेंची उपोषण थांबवण्याची जरांगेंना विनंती
राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे म्हणाले आहेत की, “तोपर्यंत विनंती अशी की, तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाज-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळूनी पर्याय सांगितला, मनोज जरांगेंना जाहीर आवाहन कल आहे . पत्रातून राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा