spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावून मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी करण्यास विरोध; ‘या’ नेत्याची राज्यपालांकडे विनंती

राज्यात विधानसभा निवडणुकीत निकाल लागलानंतर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवता न आल्याने नव्या सरकारची स्थापनाही झालेली नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपा यांच्यात अघाप मसाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे सरकार स्थापना लांबत चालली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ६ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्री शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अस असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मोठी मागणी केली आहे. ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन आहे. तसेच या दिवशी आंबेडकरी अनुयायी दु:खात बुडालेली असते. त्यामुळेच ५ डिसेंबर रोजीचा शपथविधी सोहळा पुढे ढकलावा, अशी मागणी त्यांच्या कडून आली आहे.

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालेले आहे. विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबरला लागून सुद्धा आत्तापर्यंत महायुतीने सरकार स्थापन केलेले दिसत नाही. परंतु आता माध्यमातून असे समजत आहे की, ५ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य सरकारचा स्थापन होणार आहे. त्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 6 डिसेंबर रोजी संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. ६ डिसेंबरच्या अगोदरच आंबेडकरी अनुयायी दुःखात बुडून गेलेले असतात. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम करू नये, अशी मागणी सचिन खरात यांनी राज्यपालांकडे केली आहे.

येत्या ५ डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात जागावाटपाची तसेच मुख्यमंत्रिपदाची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे काही महत्त्वाच्या मंत्रिपदांवर अडून बसलेले आहेत, असा दावा केला जातोय. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी लांबवणीवर पडतोय, असं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss