spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का?

Devendra Fadnavis on BJP Manifesto : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील १८ विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र (BJP election manifesto 2024) तयार केले आहे. यावेळी अमित शाह यांनी संबोधित केले आहे.

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का? असे आव्हान अमित शाह यांनी दिले. ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली.

उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरसंदर्भात चांगले बोलू शकत नाही? संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा, असे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले.

महाराष्ट्र अनेक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्पपत्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेनुसार काश्मीरमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते.

Latest Posts

Don't Miss