spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Amit Shah यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाले उद्धवजी, मी सांगतो तुम्ही कोणाच्या बाजूला बसलाय…

Amit Shah Attack on Uddhav Thackeray : भाजपच्या संकल्प पत्राचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी अमित शाह यांना त्यांचे जुने सहकारी आठवले. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टार्गेट केले. अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला हांला. “मी उद्धव ठाकरेंना काही सांगतो. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा. हा तुमचा प्रश्न आहे. मात्र तुम्ही कुठे बसला आहेत ते सांगतो. तुम्ही ३७० कलमाला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहेत. तुम्ही राजभूमीला विरोध करणाऱ्यांबरोबर असला आहेत. तुम्ही सावकारांसाठी अपशब्द वापरणाऱ्यांसोबत बसला आहात. तसेच तुम्ही संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. तुम्ही वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात.” अशी एकामागून एक आरोपांची सरबत्ती करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिचवले.

अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पण निशाणा साधला आहे. शरद पवार तुम्ही दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होतात. महाराष्ट्राच्या २००४ ते २०१४ पर्यंत विकासासाठी काय केलं ते सांगा. महाराष्ट्रावर तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात कितीत अन्याय झाला ते सांगा, असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला. शरद पवार हे ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. ते नकली जनादेश घेण्याचं काम करतात, अशी टीका शाह यांनी केली. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या देशामध्ये ३७० कलम संपेल असं कुणालाही वाटत नव्हतं, आणि ट्रिपल तलाक संपेल कोणीच मानत नव्हत, सीएए येईल कुणालाही वाटलं नव्हतं. राम जन्म भूमीवर राम मंदिर उभारलं जाईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. पण आम्ही हे करून दाखवलं. दलित आदिवासी आणि ओबीसींचं आरक्षण घेऊन मुस्लिमांना द्यायला महाराष्ट्र तयार आहे का. आपल्या संविधानात धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नाही. काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वीच हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनाही वचन द्याल तर विचारपूर्वक करा, हे असं सांगावं लागतं. पण मात्र आमचं तसं नाही. कर्नाटक, हिमाचल असो अनेक ठिकाणी काँग्रेस आश्वासनापासून दूर गेली आहे. पण युतीच्या आश्वासनावर देशाचा विश्वास आहे.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss