spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

अमित शाहांची शिंदे, फडणवीस, पवारांसोबत बंद दाराआड चर्चा, बैठकीत काय ठरलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या संकल्प पत्रात पुढील पाच वर्षेंमध्ये काय काय योजना राबवणार याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे.

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) १५ ऑकटोबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या संकल्प पत्रात पुढील पाच वर्षेंमध्ये काय काय योजना राबवणार याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड एक बैठक झाली आहे. चौघांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रचाराच्या धामधुमीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बंददाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या चार नेत्यांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना अमित शाहांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील १८ विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र (BJP election manifesto 2024) तयार केले आहे.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss