spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करण्याचा अमित शहांचा सल्ला, Sanjay Raut यांचा धक्कादायक दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार अमित शाह यांच्याकडे केल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या सामानाच्या आजच्या (२ मार्च) रोखटोकमधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेडमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय आणि संभाजी महारांजाच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनासाठी बेईमान दिल्लीत मुजरा झाडतात. उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरु करताना एकनाथ शिंदे यांच्यातला ‘मराठा’ जागा झाला. स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. एकनाथ शिंदे हे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टइन हॉटेलात ही भेट झाली. ५७ आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता, असंही संजय राऊत यांनी रोखटोकमधून गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत नेमकं कोणता संवाद झाला, याबाबतही खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेनी विचारले असता, आमचे १२५ लोक निवडून आले आहेत, मग तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा करू शकता? तसेच देखो भाई, वो ठीक नाही है, अभी नहीं हो सकता, भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं अमित शाह शिंदेंना म्हणाल्याचं सामानाच्या रोखटोकमधून म्हटलं आहे.

हे ही वाचा:

वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिदियानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास

International Women’s Day दिनानिमित्त MTDC कडून महिला पर्यटकांसाठी सवलत, कालावधी किती असणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss