spot_img
spot_img

Latest Posts

Amit Thackeray यांनी दिला सरकारला इशारा, शेवटचं सांगतोय….

यात्रेदरम्यान बोलताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ही यात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे. यापुढील यात्रा शांतेतत नसणार आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला सुरु वाट ही झाली आहे. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाली. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत. या यात्रेदरम्यान बोलताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ही यात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे. यापुढील यात्रा शांतेतत नसणार आहे. तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे, ते करा, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

१७ वर्षांनंतरही मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी का लागत नाही? असा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मनसेच्या या पदयात्रेत राज ठाकरे याच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या आहेत. त्यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. “गोवा-मुंबई महामार्गावर अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय बोलणार आहात? याचं उत्तर रविंद्र चव्हाण यांनी द्यावं. मनसैनिक टोल नाक्यावर बाउंसर किंवा अनधिकृत काम करणाऱ्या कंत्राटदारांसाठी नाहीत. ते महाराष्ट्रातील जनतेसाठी आहेत,” असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्राला अमित ठाकरे यांनी दिलं. रविंद्र चव्हाण यांनी उत्तर द्यावं की हा रस्ता का बनला नाही. हा जुनाच रस्ता आहे. त्यावर पाणी कीती खड्डे आहेत. प्रश्न असा आहे की हा रस्ता नेमका कधी तयार होणार? पण आता मनसे याबाबत शांत बसणार नाही. यापुढे मनसे आक्रमक भूमिका घेईल. शेवटचं सांगतोय, ही पदयात्रा शांततेत काढलीये, पण इथून पुढचा मोर्चा शांततेत होणार नाही. आम्ही शांततेत नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

चंद्रावर जास्त खड्डे की मुंबई गोवा महामार्गावर ते तुम्हीच येऊन पाहा… या महामार्गाच्या कामात 15 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हे ऐवढे पैसे गेले कुठे? आम्ही इशारा देतोय की, यावेळी अत्यंत संयमाने ही जागर पदयात्रा काढली आहे. हा इशारा आहे. नाहीतर पुढे मनसे आक्रमक होईल. मग आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. तुम्ही कीतीही केसेस करा. काहीही करा. पण या महामार्गासाठी आम्ही आक्रमक राहणारच आहोत, असंही अमित ठाकरे म्हणाले.

 

तसेच यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेली १७ वर्षे पूर्ण न झालेला मार्ग पाहून मनसे जागर यात्रेत कोकणच्या रस्त्यावर उतरला आहे. हे लोक बोलतायत पूर्ण करतोय. मग एखादा पॅच दाखवावा जो व्यवस्थित आहे. पण असं दिसत नाही. भ्रष्टाचार झाला हे एवढ्या वर्षात दिसत आहे. बॅनर मधून देखील दिसतं आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. सरकारशी याबाबत चर्चा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा. यांच्याशी चर्चा काय करणार? खळ खट्याक काय करणार इथे लोकांचे गुडघे लोकांचे तुटायला लागलेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

हे ही वाचा:

अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

सरकारच्या कांदा खरेदीवर निर्णयावर स्वाभिमनी शेतकरी संघटनेची जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss