Raj Thackeray यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात मनसेला एकही जागा न मिळाल्याबद्दल भाष्य केले आहे.या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. मनसेचे माजी आमदार Raju Patil यांना निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर याबद्दल बोलताना लोक आपल्याला मतंदान करत आहेत. परंतु ते आपल्यापर्यंत पोहचत नाही आहे. याला EVM मशीन जबाबदार आहे. असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाविषयी देखील शंका उपस्थित केली. बाळासाहेब थोरात हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत झाले, हे शक्य आहे का? त्याची चर्चा राज्यभर झाली. संगमनेरमध्येही गेले दोन दिवस हा विषय चर्चिला जात असून निकालामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आत यावर राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेत संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ(Amol Khatal) यांनी ट्विटरवर आपली रोखठोक प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अमोल खताळ यांनी ट्विट करत, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मतांच्या माध्यामतून खऱ्या अर्थाने परिवर्तन करून दाखविले आहे. त्यामुळे पराभवाचे विश्लेषण कोणाच्या तरी सांगण्यावरुन करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या पराभवाची खरी कारणे काय आहेत हे, समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे(Raj Thackeray) यांनी कधीतरी मुंबईच्या बाहेर यावे. मी तुम्हाला संगमनेरला आमंत्रित करतोय, असा खोचक टोला आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
संगमनेरच्या (Sangamner) जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास या समस्यांनकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ४० वर्षांपासून तालुक्यात साधी एमआयडीसी सुद्धा होऊ शकली नाही. ४० वर्षे आमदार, १७ वर्षे मंत्री असून देखील शेतीला पाणी नाही. मग जनतेने त्यांना निवडून का द्यावे? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी संगमनेरची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी संगमनेर भेटीला यावे असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितळे आहे.
हे ही वाचा :
पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून महिला व लहान मुलीला मारहाण
Ashok Chavan म्हणजे भाजप नव्हे, त्यांना युती धर्माची माहिती कमी आहे, म्हणत Hemant Patil यांचा पलटवार