विधानसभा निवडणुकीची धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जिंतेन्द्रे आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी होणाऱ्या डी.पी.प्लॅन वर चिंता व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे यांनी शकुन टीका केली आहे.
कुंभकर्णाच्या झोपेतून नुकतेच निवडून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड जागे झालेले आहेत. ज्यावेळेस प्रारूप आराखडा प्रकाशित झाला त्यावेळेस तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जय भारत व्यायामशाळा पटांगणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती. राष्ट्रवादी चे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंग मधे स्पष्ट केलं होत लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवणार नाही. विधानसभेच्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकांच्या मनाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत हा प्रारूप डी.पी.राबविला जाणार नाही. अशा प्रकारची चर्चा खासदार श्रीकांत शिंदे आणि नजीब मुल्ला यांची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली. निवडणुकीत ज्यांना हा मुद्दा कळला नाही कुंभकर्णाच्या झोपे मध्ये जे होते ते अचानक पणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहेत, अशी सडकून टीका आनंद परांजपे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule