राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अतिशय धक्कादायक विधान करत ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेल्याचे वक्तव्य केले आहे. लोकसत्ता वृत्तपत्रात पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या ‘द इलेक्शन दॅट सरप्राईझ इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्याविषयीचा मजकूर छापून आला आहे. यावरून राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून यावरून चर्चांना उधाण आले आहे. आधीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भुजबळांच्या विधानावरुन त्यात आणखी भर पडली आहे. अश्यातच राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावरून मोठे वक्तव्य केला आहे.
पुन्हा जेलमध्ये जायचं नाही म्हणून या लोकांनी…
अनिल देशमुख यांनी याबाबत आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळांवर दबाव असल्याचे सांगितले. ते यावेळी म्हणाले, “राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती १००% खरी आहे. त्यात सत्यता आहे कारण ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं, याची सर्वांना कल्पना आहे. भुजबळांवर ही दबाव होता, ते जेल मधून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की पुन्हा एकदा सर्व चौकशीला सामोरे जायचं आणि पुन्हा जेलमध्ये जायचं म्हणून या सर्व लोकांनी भाजपच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय केला आहे,” असे ते म्हणाले.
अनेकांवर ईडी सीबीआयचा दबाव, दबाव माझ्यावरही होता
ते पुढे म्हणाले, “अशाच पद्धतीचा दबाव माझ्यावरही होता मात्र मी फडणवीस यांना सांगितलं होतं की मी तुमच्या दबावाला मानणार नाही. तुम्ही वाटल्यास ईडी सीबीआय लाऊन मला जेलमध्ये टाका मात्र, उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या अॅफिडेव्हीटवर स्वाक्षरी करणार नाही आणि जसं मी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आणि ईडी आले. मी पण यांच्याप्रमाणे बीजेपी बरोबर गेलो असतो, तर आज मी मंत्री झालो असतो मात्र मला यांच्यासोबत जायचं नव्हतं म्हणून मला जेलमध्ये टाकलं. राष्ट्रवादी मधील अनेकांवर ईडी सीबीआयचा दबाव भाजप आणि फडणवीस आणि टाकलं होतं, दिल्लीच्या दबावाखाली सर्व चालू होतं,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल