spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Anil Parab : अनिल परबांच्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात

राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. रोज नवीन मुद्द्यांवरुन राजकारण रंगते आहे. आज राज्याचा अर्थिक अहवाल सादर होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे चर्चेत आले आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा देखील छळ झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Anil Parab: राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. रोज नवीन मुद्द्यांवरुन राजकारण रंगते आहे. आज राज्याचा अर्थिक अहवाल सादर होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे चर्चेत आले आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा देखील छळ झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलं. त्यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी करत हे विधान केल्याने मोठी खळबळ माजली आहे. अभिनेता विकी कौशल याचा ‘छावा’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरीच कमाई केली आहे. मात्र आता याच चित्रपटाचा संदर्भ देत राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला’, असे विधान करत अनिल परब यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ माजली आहे. हे विधान करत त्यांनी स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली. पण त्यांच्या या विधानामुळे आता राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या वादाची ठिणगी पेटण्याची शक्या आहे.

संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स… चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे, असे वक्तव्य अनिल परब यांनी केले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अनेक मुद्यांवरून वाद सुरू असल्याचे दिसत आहे. काल राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत होते. मात्र त्यावेळी अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.

मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे, अशीही टीका अनिल परब यांनी केली. मात्र, अनिल परब यांनी स्वतःची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुलना केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपकडून त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाणार आहे.यापूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील छत्रपती संभाजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे. जोरदार टीका झाल्यानंतर अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ‘यू टर्न’ घेतला आहे.

हे ही वाचा:

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार

राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, Ashok Saraf आणि Vandana Gupte अभिनीत “अशी ही जमवा जमवी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss