बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलं आहे. त्याची तब्येत खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया
दोन दिवसांपूर्वी पण मी ट्विट केलं होतं, आणि काल जेव्हा मी त्याच्या रिपोर्टची माहिती घेतली तर त्या रिपोर्टसमध्ये त्याला काहीही झालं नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट देखील व्यवस्थित आहेत.फक्त अँटिबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो, आणि त्याच्या सिटीस्कॅनमध्ये देखील काही आलेलं नाही, यावरून आपल्याला कळतंय की त्याची फक्त बर्दास्त ठेवण्यासाठीच त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याच्यासाठी 11 रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले. ज्या व्यक्तीला काहीच झालं नाही, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येतं, आणि त्याच्यासाठी आकारा जण आपला बेड खाली करतात तर हे चुकीचं आहे. या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत देखील मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, अशोक थोरात जे आताचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा मला असं कळालं की ते राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभेची पण निवडणूक लढवायची होती आणि विधानसभेची निवडणूक पण लढवायची होती. त्यांची आधी नाशिकला ट्र्न्सफर झाली मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या व्यक्तीबद्दल जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळाली, आंबेजोगाई येथे एक पियुष इन नावाचे अतिशय सुपर लक्झरी असं हॉटेल आहे, त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला आहे, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला आहे.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .