मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच संतप्त झाले आहे. बीड जिल्ह्यासह राज्यात संताप व्यक्त केला जातोय.काल बीड मध्ये निषेद व्यक्त करत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विविध पक्षांचे नेते सामील झाले होते. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सत्यशोधक आंदोलन सुरू केलं आहे. अंजली दमानिया बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसातून दोन तास आंदोलनासाठी बसणार आहेत. सुरवातीपासून त्या या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे असं म्हणत त्यांनी पाठपुरावा केला आहे. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. त्यांचा हा ट्विट चर्चेत आला आहे.
काय आहे ट्विट
संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत. त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील समोर आले आहे. कोण आहे हा बडा नेता, तत्काळ नाव जाहीर करा, अशी मागणी अंजली दमानया यांनी केली आहे. दमानिया यांचं हे ट्विट पुन्हा चर्चेत आलं असून बीडमधील हत्याप्रकरणात बडा नेता कोण, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
CID चे पथक बीडमध्ये दाखल
CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि CID चे पथक बीडमध्ये दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांकडून सीआयडी पथकाने माहिती घेत तपास सुरु केले आहेत. फरार आरोपींनी फेकलेला मोबाइल मिळाला असून या मोबाईलमधील माहितीद्वारे CID पथक सध्या चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या लोकांना संपर्क केला त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या संदर्भात कोणीतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या CID पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.
फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरवात
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यास मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. फरार आरोपींच्या मालमत्तेचा शोध घेण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका