spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

अंजली दमानिया यांनी राज्यसरकारला दिलेला अल्टिमेटम संपला; धंनजय मुन्डेबद्दल मोठा खुलासा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्य सरकारला चार दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांमध्ये राज्य सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम अंजली दमानिया दिला होता. मात्र राज्य सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही आहे. आता अंजली दमानिया ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारला मी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांमध्ये राज्य सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. परंतु सरकारने राजीनामा घेतला नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. तसेच या चार दिवसांमध्ये मी पुरावा गोळा केले आहेत. उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंबद्दल मोठा खुलासा करणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. मात्र धनंजय मुंडे दोघांचे अतिशय जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाहीय. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तो पर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही. धनंजय मुंडे हे एक मंत्री म्हणून मला मान्य नाही. जर असे लोक जे दहशतवाद करतात, अत्याचार करतात, वाल्मिक कराड आणि कैलास फडसारख्या लोकांना मोठा करतात, अशा लोकांना विधानसभेत जाऊन सामान्य जनतेसाठी न्याय बनवणार असणार तर आम्हाला मान्य नाही, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार
आतापर्यंत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या राख घोटाळा, काळे पैसे त्यांच्या खात्यात कसे आले, सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्राला कसा झाला, हे दाखवलं. त्यांच्या जमिनी दाखवल्या. त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवला, त्यांच्या आणि वाल्मिकी कराड यांच्या जवळीक दाखवले. उद्या जे मी पत्रकार परिषद घेऊन पुरावा दाखवणार असून मंत्री असताना भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा असणार आहे. कसा यंत्रणांच्या गैरवापर केला जातो त्याच्या देखील खुलासा करणार आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे, आणि मागणी करणार आहे तुम्ही दिलेला त्यांना पाठिंबा काढून घ्या. दुसरी मागणी अशी असेल हे पुरावा मी जे दिले, हे तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करायला हवी. असं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत….
नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे…धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss