आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. आदर्श गाव हिरवे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्तिथ राहणार आहेत. मंत्र्यांना खातेवाटपानंतर हा त्यांचा पहिलाच अहिल्यानगर दौरा आहे. हेलिपॅडवर त्यांनी गावात आगमन केलं. यावेळी तिथे भाजप नेते पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्तीथी होते. अण्णा हजारे यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
अनेक आंदोलनामुळे अण्णा हजारे नेमी चर्चेत असायचे. मात्र आता अण्णा हजारे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते फारसे चर्चेत नव्हते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला अहिल्यानगरमध्ये उपस्तिथ असल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अण्णांनी पुष्पगुछ देऊन फडणवीस यांचं स्वागत केलं आहे.
अण्णा हजारे यांनी देशात काँग्रेसची सत्ता असताना जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आलं. अण्णा हजारे यांनी या आंदोलनापूर्वी देखील अनेक आंदोलनं केली. आता देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत अण्णा हजारे यांनी स्वागत केलं आहे. या भेटीमुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule