बीड मधील आणखी एक कुख्यात गुंडाचा बेदम अमानुषपणे मारहाण करतानाच व्हिडीओ समोर आला आहे. गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न समोर येत आहे. आठ दिवसांपुर्वी बाबी ता. शिरूर येथील ढाकणे नावाच्या व्यक्तीला या खोक्या भाईने मारहाण केली असल्याचं समोर आलं. हा खोक्या भाई आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण विधिमंडळात आणि सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील उचलून धरलं आहे. त्यांनतर आता आणखी एका व्यक्तीला खोक्या भाईने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाण झालेला व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील कैलास वाघ असल्याचे समोर आला आहे. कैलास वाघ हा बीड जिल्ह्यातील खोक्या भाईच्या परिचयातील व्यक्तीकडे पोकलेन ओळखीच्या गुंडांनी कैलास वाघ याला त्याच्या मूळ गाव असलेल्या महारखेड येथून उचलून नेऊन बीड जिल्ह्यातील अज्ञात शाळेत नेऊन मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात कैलास वाघ याने दावा केला आहे की, मला हे काम करायचं नव्हतं म्हणून मी काम सोडलं आणि गावी निघून आलो. मात्र, काम सोडल्यामुळेच मला मारहाण करण्यात आल्याचा दावाही कैलास वाघ याने केला आहे.
मी त्यांच्याकडे कामाला होतो…
मी त्यांच्याकडे कामाला होतो. त्यावेळी माझे त्यांच्याकडे पैसे होते. मी त्यांना पैसे मागितले तेव्हा त्यांनी मला काम का सोडलं असा सवाल केला. त्यांनी मला आमच्या गावातून तिकडे नेलं, मला मारहाण केली. तो व्हिडिओ बघा. मला त्यांनी धमक्या दिल्या तुला गाडीने उडवून टाकेन, जीव घेईन अशी धमकी दिली. मला काम का सोडलं असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. हा व्हिडिओ कोणी व्हायरल केली हे मला माहिती नाही असंही कैलास वाघ यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.