राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही शपथविधी पार पडणार आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या दारुण पराभवाचा धक्काच त्यांना बसला. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का लागला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक बडा नेत्याने देखील अजित पवारांची भेट घेतली आहे. हे तिन्ही आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
शरद पवारांना मोठा धक्का लागला आहे. माजी आमदार राहुल जगताप आणि माजी आमदार मानसिंग नाईक यांनी अजित पवारांची भेट घेतली. यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निलंबित करण्यात आलं होत. आता यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गटात आता खळबळ उडाली आहे. राहुल जगताप आणि मानसिंग नाईक हे दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे.अपूर्व हिरे हे या पूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटातच होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अपूर्व हिरे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांनी निकालाच्या दिवसांपासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवाराना फोन करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली आहे. यापैकी राहुल जगताप लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
राहुल जगताप आणि मानसिंग नाईक अशी या दोघांची नावे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाचे राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिल होते. मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला. तर मानसिंग नाईक हे शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. राहुल जगताप यांनी अजित पवार यांच्या सोबत देवगिरी बंगल्यात बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राहुल जगताप लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule