spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

दीपक केसरकरांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल, गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

१५ डिसेंबरला आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक अनुभवी मंत्र्यांना डावलण्यात आले आहे. छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. विध्यार्त्यांच्या शालेय गणवेश योजनेचा निर्णय दीपक केसरकर यांनी घेतला होता. त्यात आता बदल होणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले आहे. त्यावरून केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती असं त्यांनी म्हंटल होत. आता दीपक केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असं समोर आले आहे.

२१ डिसेंबरला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. या आधी दीपक केसरकर यांच्याकडे होता. दीपक केसरकर यांनी विध्यार्त्यांच्या शालेय गणवेश योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयात बदल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे.

सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, या शिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असतांना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. आता पुस्तकाला वह्याचीपाने जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार सुरू झाला आहे. ज्याप्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे.

पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्याप्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची, तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे.नवे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे, दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करुन ते रद्द होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये
दरम्यान, शिक्षण खात्याचा पदभार मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचले आहेत. वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचनही करून घेतले. शिक्षकांच्या शाळेतील दप्तरांचीही तपासणी केली, मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्याचं पाहायला मिळालं. शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार आदी अडचणी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा अशा सूचना शिक्षकांना मंत्रीमहोदयांकडून करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

Eknath Shinde पत्रकार परिषदेतून होणार व्यक्त, नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde यांनी महायुतीपुढे टाकली नवी गुगली; म्हणाले,”मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss