spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाला पुन्हा धक्का उपनेते बबनराव घोलप यांनी दिला राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकीकडे जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी राजीनामा (Resignation) दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकीकडे जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी राजीनामा (Resignation) दिला आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळालाय आहे.

शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausahab Wakchaure) यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचनादिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तसंच वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील विरोध केला होता.

त्यातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchore) यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मातोश्री येथे जाऊन पक्षप्रवेश केल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. या सर्वच निर्णयामुळे बबनराव घोलप व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. परिणामी बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा (Deputy Leader) व शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.

हे ही वाचा: 

जागतिक नेत्याचं राजघाटवर महात्मा गांधींना नमन

उपोषणाच्या तेराव्या दिवशी नक्की काय म्हणाले मनोज जरांगे …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss