शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीचा व्हिडिओ देखील वायरल झाला होता. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेला सतीश थोरात उर्फ खोक्या भाईने ही बेदम मारहाण केल्याचा समोर आलं होत. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे. प्रचंड पैसे आणि दहशतीच्या जोरावर खोक्या भाईने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता. त्याच्या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक एक करून बाहेर येत आहेत.
खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. आजूबाजूच्या गावाचे लोक सांगतात की खोक्या भाईने आतापर्यंत साधारण २०० पेक्षा जास्त हरिणांना मारलाय तर डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत. खोक्या आणि त्याचे सहकारी आठ दिवसापूर्वी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाईने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली.
यामध्ये दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला लंगडत चालावे लागत आहे. त्याच्या अंगावर वारही आहेत. दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा 19 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याचा ‘आका’ सुरेश धस हेच आहेत. त्यामुळे पोलिसांना आता आकावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही शिरुर बंद करुन आमरण उपोषणाला बसू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
खोक्या भाईला अटक कधी?
खोक्या भाईचा मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता खोक्या भाईला अटक कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. बीड पोलिसांनी खोक्या भाईला अटक करण्यासाठी दोन पथकं स्थापन केली आहेत. खोक्या भाईंचे दोन प्रकारच्या मारहाणीचे व्हिडीओ आहेत. शिरूर पोलीस ठाण्यात खोक्या भाईवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही त्याला अटक झालेली नाही आहे. आम्ही त्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार केली आहेत, असे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार