बीडमध्ये सध्या तणावाचा वातावरण आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेला आहे. बीडमध्ये अवैधरित्या चालणारे काळे धंदे समोर येत आहे. परळीत तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात महादेव मुंडे यांच खून करण्यात आला होता. या हत्येला १५ महिने उलटून गेले तरी आरोपी मोकाट आहे. न्यायासाठी आता किती दिवस वाट बघायची? असे म्हणत महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण पवित्र घेतल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी ५ सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे.
महादेव मुंडेंच्या तपासासाठी पथकाची नेमणूक
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पत्रकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे .एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे .महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर या तपासाच्या तपासासाठी पाचसदस्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणावरून पोलीस अधीक्षक नवनीत कवती यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय . महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास तातडीने एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती .
हे ही वाचा:
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई