रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत एकमत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडमधील पालमंत्र्यांच्यापदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासानंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आले. अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत निदर्शने करण्यात आले.
भरत गोगावले यांच्याप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. दादा भुसे यांना पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रिपद हवे होते. पण नाव जाहीर झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रीपद हे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. त्यामुळे दादा भुसेही नाराज झालेत. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील महायुतीतील वाद वाढल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे आता रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती