Friday, December 1, 2023

Latest Posts

सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती, आदित्य ठाकरेंचं ‘फायरिंग’ म्हणाले…

शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे शिलेदार समजले जाणाऱ्या आमदार सदा सरवणकरांची मुंबईतील सिद्धीविनायकच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे शिलेदार समजले जाणाऱ्या आमदार सदा सरवणकरांची मुंबईतील सिद्धीविनायकच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. एकीकडे त्यांची नियुक्ती जाळी तर दुसरीकडे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. त्यांच्या या नियुक्तीवर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील जोरदार हल्लबोल हा केला आहे. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्याला सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्षपद (Siddhivinayak Temple Trust) बहाल करण्यात आलं आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर टीका केली.

गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. आता त्यांची सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, पण तसे न करता त्याला बक्षीस देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा (Aadesh Bandekar) कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी आमदार सदा सरवणकरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे ट्विट मध्ये काय म्हणाले आहेत?

दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती.
त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले.
हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय!
मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?
आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?
खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता…
पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल…

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss