एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा होत असतानाच झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी काल २८ नोव्हेंबरला शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. यानंतर हेमंत सोरेन यांनी मैय्या सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती २५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
झारखंडच्या मंत्रिमंडळातून काल फक्त हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या १२ इतकी आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची पथ दिली. शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मैय्या सन्मान योजनेतील रक्कम १००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ महिलांना डिसेंबर महिन्यापासून घेता येईल.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु असून महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील महिलांना या योजनेनुसार नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. आतापर्यंत महिलांना ७५०० रुपये मिळाले असून डिसेंबर महिन्याची रक्कम मिळताना ती १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे हताश? देवेंद्र फडणवीस – अजित पवारांनी शेअर केले अमित शाहांसोबतचा फोटो, पण शिंदे मात्र…
अमित शाहांसोबत रात्री पार पडली बैठक, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…