३ मार्चपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये आज १० मार्चला अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्या नंतर विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून बाहेर निघाले. त्याचवेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांनी विधिमंडळाच्या गॅलरीत आमने सामने भेट झाली. या भेटीत एकमेकांपासून नजर चोरण्यात आली तर नमस्कारही करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे दुर्लक्षित करून सरळ पुढे निघून गेले.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका टिप्पणी केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोलेबाजी केली. ते म्हणाले, काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? तर अजित पवार यांना उद्देशून म्हणाले की, दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही.
पुढे ते म्हणाले की, “सरकारने आश्वासने पूर्ण केली नाहीत. निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती केल्या. सरकारने महाराष्ट्र कर्जबाजारी केला. या अर्थसंकल्पात कर्जमाफी हवी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपयेही दिले नाहीत. विकास नाही, राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प आहे. २ विमानतळ जोडण्याचं काम अदानीचं, सरकारचं नाही,”असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर लगावला.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us