spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Ashok Chavan यांचा शरद पवारांवर पलटवार; “मी संधीसाधू तर…”

अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवारांच्या या टीकेला अशोक चव्हाणांनी उत्तर दिले आहे. मी संधीसाधू तर शरद पवार कोण, याचाही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच भाजप खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण हे सुद्धा राजकारणात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. भाजप महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी अशोक चव्हाण मोट बांधत आहेत.

अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी शरद पवारांनी केलेल्या टिकेवरही पलटवार केला आहे. अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवारांच्या या टीकेला अशोक चव्हाणांनी उत्तर दिले आहे. मी संधीसाधू तर शरद पवार कोण, याचाही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे अशोक चव्हाण म्हणाले. शरद पवार नेमकं काय म्हणाले हे मला माहित नाही, पण शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या लहान माणसावर वक्तव्य केलं असेल असं मला वाटत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. त्यानंतर जर मी संधी साधू आहे तर मग पवार साहेब काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा शरद पवार यांना द्यावं लागेल, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

मनोज जरांगेच्या भूमिकेबद्दल अशोक चव्हाण म्हणाले की, हे लागू कोणाला होते, ज्यांनी अन्याय केला असेल त्यांना लागू होत असेल. ज्यांनी समाजासाठी काम केले, त्यांना मदत करा ही भूमिका आहे आणि जरांगे त्यांच्या भूमिकेबद्दल मी सकारात्मक पद्धतीने बघतो, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. मी सामाजिक आरक्षणासाठी भूमिका घेतली, सभागृहात विषय मांडले, त्याचा पाठपुरावा केला या सर्व गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना मदत ही केलीच पाहिजे.

हे ही वाचा:

Manoj Jarange यांनी आखली पुन्हा रणनीती; सरकारची वाढणार डोकेदुखी

Manoj Jarange Patil यांच्यावर नेमका कोणी केला आरोप; … २४ तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss