स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनेक चर्चा उमटताना दिसत आहे. अशातच खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नांदेड जिल्ह्यात महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील (Hemant patil) यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर देत अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही असा थेट पलटवारच त्यांच्यावर केला आहे. शिवाय या बाबात आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यासोबत बोलू. नांदेडमध्ये आता चव्हाणांचं एकतर्फी काही चालणार नाही असे संकेत पाटील यांनी दिले आहेत.
नांदेडमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना, अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही. भाजपमध्ये अशोक चव्हाण नवीन आहेत. अशी टीका ही शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केली.अशोक चव्हाणांच्या स्वबळावर निवडणूक लढऊ यावर शिवसेना शिंदे गटाने ही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण स्वबळ आहेच. या मेळाव्यात बोलताना युती धर्म काय असतो देखील त्यांनी चव्हाण यांना सांगितलं. चव्हाण हे भाजपमध्ये नव्याने आले आहेत. त्यामुळे त्यांना युती धर्माबाबत कमी माहिती आहे. पण भाजप आणि शिवसेनेची जुनी युती आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांना कार्यकर्त्यांना युती धर्म काय असतो हे माहित आहे. आम्ही त्यांच्या हातात हात घालून काम केलं आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते चैतन्य देशमुख, प्रविण साली यांची नावेही या निमित्ताने हेमंत पाटील यांनी घेतली.
अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत चांगलेच उमटताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट याबाबत भलताच आक्रमक झाला आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरू केले आहे. शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करावी असे आदेशही देण्यात आले आहेत.मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत करण्यात आलेली नाही आहे.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?