spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, रिश्ते हमेशा रहते है, सुप्रिया सुळें यांचं सूचक वक्तव्य

प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, खाली हाथ आये थे खाली हात जायेंगे. इलेक्शन येतात आणि जातात पण रिश्ते हमेशा रहते है. मी कोणत्याही पदासाठी महत्वकांक्षी नाही. पण हे अनेकांना पटत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. ते कोल्हापूर मध्ये बोलत होते.

माझ्या निवडणुकीत हे लक्षात आलं की कोणी आपल्या सोबत नसलं तरी चालेल पण जनता आपल्या सोबत असायला हवी, तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. सगळी यंत्रणा माझ्या विरोधात होती. आमदार, खासदार, सरपंच सुद्धा माझ्यासोबत नव्हते. तरी जनतेनं मला निवडून आणलं असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार हे कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही
माझ्या वडिलांचे कोल्हापूरवर मोठं प्रेम आहे. आमचे वडील कधी रिटायर्ड होतील असं अनेकांना वाटतं. पण ते कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही. आबिटकर साहेब तुमचा पक्ष फुटला कारण नेते वेळ देत नाहीत म्हणून आणि आमचा पक्ष फुटला नेते जास्त वेळ देतात म्हणून. खात्यातील फाईलींबद्दल बोलायला अभ्यास लागत नाही, इतिहासावर बोलायला जास्त अभ्यास करावा लागतो. मला आता ऐकायला शिकवलं आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्यात खूप शक्ती लागते. म्हणूनच मी लोकसभेला जिंकलो आहे. आरे ला का रे केलं असतं तर निवडून आलो नसतो असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

पुढे ते बोलले, महाराष्ट्र सरकारने ताराराणी यांचे धडे पुस्तकात आणले पाहिजेत असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. केवळ पुतळे बांधून आणि मालिका तयार करून चालणार नाही. हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. कितीही लढू पण हा देश संविधानाने चालवू असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील सुळेंनी प्रतिक्रिया दिली
गुन्हा करणारा जितका दोषी असतो तसा गुन्हा सहन करणारा देखील दोषी असतो. बीड प्रकरणात आपण गप्प बसलो तर चालणार नाही असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss