आज ९ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातले वातावरण चांगलंच तापलं असतानाच या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरेश धस यांच्याकडून रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आज या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही. मुख्यमंत्री देखील तसं म्हणाले आहेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू.”
पुढे अजित पवार म्हणाले,”संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन. तर पालकमंत्रीपदाबद्दल बोलताना कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. माझा पक्ष त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचा निर्णय ते घेतील. त्यांच्या खासदारांशी कोणीही संपर्क साधलेला नाही.
हे ही वाचा:
आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात; जरांगेची Dhanjay Munde यांच्यावर टीका
राम कमलच्या “बिनोदिनी” तील “कान्हा” गाण्यासाठी श्रेया घोषालच्या आवाजाची जादू